हरयाणातील रस्ते अपघातात लातूर जिल्ह्यातील भाविकांचा मृत्यू

771

देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांचे वाहन हरयाणात अपघातग्रस्त झाले. या भिषण अपघातामध्ये १२ जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत. मरण पावलेल्यामंध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी, लामजना, याकतपूर सह धाराशिव जिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील भाविकांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागौर जिल्ह्यातील किशनगढ ते हनुमानगढ या मेगा हायवेवरील काला भाटा जवळ मिनी बस क्रमांक एम.एच.२३ एएस ७१७६ अपघातग्रस्त झाली. भरधाव वेगातील ही मिनी बस समोरुन आलेल्या जनावरास (सांड) चुकवण्याच्या नादात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस झाडावर जाऊन आदळून पलटी झाली. या अपघातामध्ये 12 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या