आज फडणवीस-खट्टरच नाही तर योगी-नीतिश यांचीही अग्निपरिक्षा

698

महाराष्ट्र- हरयाणा यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाबरोबरच आज देशातील 17 राज्यांमधील 52 मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालाकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.  यात 50 जागा विधानसभा आणि 2 जागा लोकसभेसाठी आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये 11 जागा विधानसभेसाठी असून बिहारमध्ये 5 जागा विधानसभा आणि एक जागा लोकसभेसाठी आहे. यात मध्य प्रदेशमधील एक आणि राजस्थानमधील दोन विधानसभा जागांचा समावेश आहे.

आसाम

आसाम विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून चार जागांपैकी 3 जागांवर भाजप आघाडीवर असल्याचे चित्र आहे. रतबारी, रंगपारा, सोनारी येथून भाजपने आघाडी घेतली आहे. तर जानिया येथून ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (AIUDF) पुढे आहे.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमध्ये 11 जागा -उत्तर प्रदेशमधील लखनौ. बाराबंकीतील जैदपूर, चित्रकूटमधील मानिकपूर, सहारनपूरयेथील गंगोह, अलीगढमधील इगलास, रामपूर, कानपूर मधील गोविंदनगर, बहराईच मधील बलहा, प्रतापगढ. मऊ येथील घोसी आणि आंबेडकरनगरमधील जलालपूर विदानसभा जागांचा समावेश आहे.

रामपूर आहे प्रतिष्ठेची जागा

उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकांमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत रामपूरची जागा आहे. आजम खान यांचा किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामपूर जागेसाठी समाजवादी पक्षाने आजम खान यांची पत्नी ताजीन फातिमा यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर फातिमा यांना टक्कर देण्यासाठी भाजपने भारत भूषण गुप्ता यांना उभे केले आहे. तर रामपूरमधून काँग्रेसने अरशद अली खान यांना तिकीट दिलं आहे. तसेच ते पेशाने वकील आहेत. तर बसपाने जुबैर मसूद खान यांना मैदानात उतरवलं आहे.

बिहारमध्ये 6 जागा

बिहारमध्ये समस्तीपूर लोकसभा जागेबरोबरच नाथनगर, सिमरी बख्तियारपुर, दरौंदा, बेलहर आणि किशनगंज विधानसभेच्या जागा आहेत.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशमधील झाबुआ विधानसभा जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकांवर संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. येथे पाच उमेदवार मैदानात आहेत.

राजस्थान

राजस्थानमधील झुंझुनू मंडावा आणि नागौर येथील खींवसर विधानसभा जागेवर पोटनिवडणुका होत आहे. येथे भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरस बघायला मिळत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या