महिनाभरात सरपंचपदासाठी आरक्षण सोडत

राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकाचे निकाल जाहीर झाले आहेत. आता पुढील एका महिन्यात सरपंचपदाचे आरक्षण काढले जाईल अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरमध्ये बोलताना दिली.

या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. मात्र आरक्षण सोडत बाकी असल्याने बहुमत मिळूनही ग्रामपंचायत ताब्यात आली असे निश्चित नाही. त्यामुळे विजयी उमेदवारांची धाकधुक कायम आहे.

निवडणुकीच्या अगोदर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच कोरोनामुळे आरक्षण सोडत निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय घेतला होता.

विजयी होऊनही धाकधूक कायम

गटांना ग्रामपंचायतीत बहुमत मिळाले असले तरी ज्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे, त्या प्रवर्गातील उमेदवार बहुमत मिळालेल्या गटाकडे नसल्यास पदरी पराभव पडणार आहे. त्यामुळे लाखों विजयी उमेदवारांची धाकधूक कायम राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या