हाथरस प्रकरण – एसपी, डीएसपी आणि इन्स्पेक्टर निलंबित, योगी सरकारची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने मोठी कारवाई करत एसपी, डीएसपी आणि इन्स्पेक्टर यांना निलंबित केले आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबियांसह पोलिसांचीही नार्को पॉलिग्राफी टेस्ट करण्यात येणार आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

वृत्तानुसार, चडपा पोलीस स्थानकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांची, आरोपी, पीडितेचे कुटुंबीय या सर्वांची नार्को पॉलिग्राफी टेस्ट केली जाणार आहे. तसेच या प्रकरणातील प्राथमिक अहवालावरून योगी सरकारने एसपी विक्रांत वीर, सीओ राम शब्द, इन्स्पेक्टर दिनेश कुमार वर्मा, एसआय जगविर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

योगींचे ट्विट
योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून राज्यातील माता-भगिनींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना इशारा दिला आहे. ‘उत्तर प्रदेशमधील माता-भगिनींच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवण्याचा विचार करणाऱ्यांचा समूळ नाश सुनिश्चित आहे. त्यांना असा दंड मिळेल की येणाऱ्या पिढ्या उदाहरण म्हणून याकडे पाहतील’, असे ट्विट करून योगींनी राज्यातील माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी आणि विकासाठी राज्यसरकार कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.

राजस्थानमधील सामूहिक बलात्कारावर मौन, हाथरस घटनेवर राहुल-प्रियांकाची नौटंकी! – रवीशंकर प्रसाद