‘भूताच्या घरा’ त 10 तास रहा आणि कमवा 14 लाख रुपये !

4472

सध्या अॅडव्हेंचर चँलेजचा ट्रेंड आहे. काहीतरी जगावेगळे करण्याची चढाओढ प्रत्येकामध्ये लागली आहे. अशा लोकांसाठी ‘हॉन्टेड हाऊस’ चे आव्हान तयार करण्यात आले आहे. हे घर तयार करणाऱ्या मालकाने या घरात 10 तास घालवल्यास 14 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. जाणून घेऊया अशा या भूताच्या झपाटलेल्या घराची माहिती.

main-photo

 

‘हॉन्टेड हाऊस’ म्हणजेच झपाटलेल्या किंवा भुताटकीच्या घराबाबत आपल्याला गोष्टींमधून किंवा चित्रपटातून माहिती मिळालेली असते. मात्र, प्रत्यक्षात अशा घरात राहण्याच्या प्रसंग आला तर…मात्र, काही धाडसी व्यक्तींसाठी ‘टेनिस’ या शहरातील समरटाऊनमध्ये एक ‘हॉन्टेड हाऊस’ उभारण्यात आले आहे. या घरात 10 तास घालवण्याचे आव्हान पार केल्यास तब्बल 14 लाख रुपये मिळणार आहेत. मात्र, या घरात पोहचून हे आव्हान पेलणे जिकीरीचे आहे. मैक मी मेनर असे या भूताच्या घराचे नाव आहे. या घरात जाण्यासाठी 40 पानांचे करार करावा लागतो. तसेच या आव्हानासाठी काही नियमही आहेत. या घरात जाणाऱ्याचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असायला हवे. तसेच मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्रही देणे गरजेचे आहे. ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खऱ्या आव्हानाची सुरुवात होते.

hunted2

 

घरात प्रवेश केल्यानंतर तेथील वातावरण बघूनच अनेकांची पाचवर धारण बसते. चित्रविचित्र आवाज येत असतात. मात्र, ते कोठून येतात, तेच समजत नाही. आवाजाचा माग काढायला गेल्यास आपण मार्गावरून भरकटतो आणि नेमके कशासाठी आलो होतो ते विसरून वेगळ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे चिडचीड वाढते आणि राग येतो. मात्र, त्यावेळी रागावर नियंत्रणे गरजेचे असते. अशा वेळीच भयावह वेषभूषा केलेले या भूताची घरातील पात्रे अचानक प्रकट होतात आणि मग घाबरगुंडी उडायला सुरुवात होते. त्यामुळे अनेकजण या टप्पातच घराबाहेर पडणे पसंत करतात. मात्र, एखादी व्यक्ती या टप्प्यातून पार झाल्यास पुढे आव्हाने आणखी खडतर होत जातात. या भूताच्या घरात प्रवेश घेणाऱ्यांना आधी सर्व गोष्टींची माहिती दिली जाते. जेणेकरून त्याची मानसिक तयारी झालेली असेल.या आव्हानात कोणतीही शारीरिक हानी होत नाही. मात्र, घरातील वातावरणामुळे येणारे दडपण सहन करणे कठीण असते. या घरात 10 तास राहणाऱ्या धाडसी व्यक्तीच्या शोधात असल्याचे या घराच्या मालकाने सांगितले. काहीजणांनी या घरातील काही टप्पे पार केले आहेत .मात्र, 10 तासांचे आव्हान अजून कोणीही पूर्ण केले नाही, असे घरमालकाने सांगितले. hunted-house

 

आपली प्रतिक्रिया द्या