
राज्यासह देशभरात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी नागरिक कामाशिवाय बाहेर पडणे टाळत आहेत. सूर्यनारायण अक्षरशः आग ओकतोय. याचाच प्रत्यय देणारा दिल्लीतील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यात तळपत्या उन्हात आपल्या घराच्या गच्चीवर एक व्यक्ती ऑम्लेट बनवताना दिसतेय. विशेष म्हणजे या व्यक्तीने गॅस किंवा चुलीवर नाही तर चक्क तळपत्या उन्हात ऑम्लेट बनवले आहे. हे पाहून नेटिझन्सदेखील आश्चर्यचकित झाले आहेत.




























































