एचडीएफसीचे महाराष्ट्रातील कर्जवितरण तीन लाख कोटींवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एचडीएफसी बँकेने महाराष्ट्रातील कर्जवितरणाचा तीन लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. 31 मार्चपर्यंत एकूण 3,28,508 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. बँकेने शुक्रवारी ही माहिती दिली. एचडीएफसीने सर्व प्रकारची कर्जे दिली. त्यात रिटेल, कॉर्पोरेट, एमएसएमई आणि मायक्रोफायनान्स ग्राहकांना देण्यात आलेल्या कर्जांचा समावेश आहे. बँकेने 31 मार्च 2021 पर्यंत 2,66,082 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले होते. हा आकडा 31 मार्च 2022 पर्यंत 3,28,508 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. वर्षभरात कर्जवितरण 23 टक्क्यांनी वाढले. महाराष्ट्रातील ग्राहकांनी सेवेची संधी दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया एचडीएफसीचे शाखा बँपिंग प्रमुख अभिषेक देशमुख यांनी दिली.