
- वारंवार खोकला येत असल्यास धणे व सुंठ सम प्रमाणात घेऊन त्याचा काढा करून प्यावा. आराम मिळतो.
- रात्रभर पाण्यात धणे भिजत घालून ठेवावेत आणि दुसऱया दिवशी सकाळी उठून ते पाणी प्यावे. त्याने अंगातील उष्णता, दाह कमी होतो.
- नियमित धण्याचे पाणी प्यायल्याने तोंडाच्या दुर्गंधीची समस्या दूर होते.
- सर्दी-पडशाचा त्रास होत असल्यास धणे, दालचिनी, गवती चहा, तुळस आणि सुंठ यांचा काढा करून प्यावा, त्याने आराम मिळतो.
- अतिसार होत असल्यास धण्याचे पाणी प्यावे, त्याने आराम मिळतो.
- रात्रभर धणे भिजत ठेवून ते पाणी दिवसभर प्यायल्याने तहान कमी लागते.
- धन्याच्या पाण्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ऑसिड असते. हे नियमित प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
- ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांनी धण्याची पूड खडीसाखरेसोबत खाल्ल्यास तत्काळ आराम मिळतो.
- जुलाब होत असल्यास धण्याचा काढा घ्यावा.
- गॅसचा त्रास असल्यास तो कमी करण्यासाठी बडीशेप आणि धणे एकत्र करून खावे. गॅस निघून जातो.
- हातापायाची जळजळ होत असल्यास रात्री एका कपात एक चमचा धणे आणि जिरं मिक्स करून ते पाणी गाळून सकाळी प्यायल्याने जळजळ कमी होते.
























































