
फळांमध्ये पेरू हे अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी फळ मानले जाते. त्यामध्ये अ, क जीवनसत्त्व, फायबर, पोटॅशियम, फोलेट, मॅग्नेशियम आणि विविध अँटिऑक्सिडंट्स आढळतात.
पेरूमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते आणि संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
पेरू हे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास, वजन कमी करण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासह अनेक आरोग्य विषयक समस्यांसाठी लाभदायी आहे.





























































