Health Tips – रोज ‘एवढी’ पावलं चाला आणि आयुष्य वाढवा

निरोगी आयुष्यासाठी सकस आहार, पुरेशी झोप आणि व्यायमही आवश्यक असतो. यासाठी तज्ज्ञ रोज चालण्यास सांगतात. रोज किती चालावे याबाबत मतमतांतरे आहेत, मात्र एका अभ्यासात दररोज 7 हजार पावलं चालल्याने आयुष्य वाढते आणि मृत्यूचा धोकाही 50 ते 70 टक्क्यांनी कमी होतो, असे दिसून आले आहे. जामा नेटवर्क ओपन जर्नलमध्ये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जामा नेटवर्क ओपन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या फिजिकल अॅक्टिव्हिटी एपिडेमायोलॉजिस्ट अँड स्टडीचे प्रमुख लेखक अमांडा पलूच यांनी सांगितले की, चालणे आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र दररोज 10 हजारांहून अधिक पावले चालल्याने किंवा वेगाने चालल्याने शरिराला कोणताही अतिरिक्त लाभ होत नाही असे दिसून आले.

शोधकर्त्यांनी कोरोनरी आर्टरी रिस्क डेव्हलपमेंट इन यंग एडल्ट स्टडीच्या माहितीवर संशोधन केले. यात 38 ते 50 वर्ष वयोगटातील 2100 स्वयंसेवकांना 2006 मध्ये एक्सिलेरोमीटर देण्यात आले. यानंतर जवळपास 11 वर्ष त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले. 2020-21 मध्ये मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले.

Food Tips शरिरातील लोहाची कमतरता भरुन काढतात ‘हे’ पदार्थ, आहारात करा समावेश

स्वयंसेवकांची तीन गटात विभागणी करण्यात आली. लो स्टेप वॉल्यूम (7 हजार पावलांपेक्षा कमी), मॉडरेट (7 ते 9 हजार पावलं) आणि हाय (10 हजारांहून अधिक पावलं) अशी विभागणी करण्यात आली.

Food Tips – चिकन, अंडी विसरा; प्रोटिनसाठी ‘हे’ शाकाहारी पदार्थ आहेत जबरदस्त पर्याय

अभ्यासानंतर तज्ज्ञांनी सांगितले की, दररोज 7 ते 9 हजार पावलं चालणाऱ्या स्वयंसेवकांच्या आरोग्याला याचा खूपच फायदा होताना दिसून आला. मात्र जी लोकं दररोज 10 हजार पावलं चालत होती त्यांना याचा अतिरिक्त फायदा मिळताना दिसला नाही. रोज 7 हजार पावलं चालणाऱ्यांना मृत्यूचा धोकाही 50 ते 70 टक्के झाल्याचे निदर्शनास आले. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तज्ज्ञांनी दिला सावधानतेचा इशारा, जाणून घ्या…

आपली प्रतिक्रिया द्या