
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी सावधगिरीने पावले उचलली पाहिजेत. जेवणाच्या आधी, शौचाला जाऊन जाऊन आल्यावर, खोकल्यावर, शिंकल्यावर हात साबण आणि पाण्याने 20 सेकंद धुणे हे संसर्ग कमी होण्यासाठी खूप गरजेचे आहे. दुसरा पर्याय म्हणजे 60% अल्कोहोल असलेले सॅनिटायझर वापरणे.परंतु हे सॅनिटायझर लहान मुलांसाठी (साधारण 1 ते 10 वर्ष ) किती सुरक्षित आहे हा प्रश्न सगळ्या पालकांना पडला असेल. याबाबद्दल आज आम्ही आज तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
तज्ज्ञांनी असं कधीही सांगणातलं नाही की, लहान मुलांचे हात धुण्यासाठी सॅनिटायझर वापरू नका. साहजिकच पाणी आणि साबण वापरून हात धुणे हा पहिला पर्याय आहे. जर साबण आणि पाणी नसेल तर सॅनिटायझर वापरले पाहिजे. परंतु लहान मुलं सॅनिटायझर वापरत असतील तर तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे.
हॅन्ड सॅनिटायझरमध्ये 60% अल्कोहोल असते. जे कोणत्याही अल्कोहोल पेयामधील प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे. सॅनिटायझर वापरल्यावर डोळ्यांना हात लावणे किंवा हात नकळत तोंडात जाणे यांमुळे दुष्परिणाम होऊ शकतात. लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी खालील सावधगिरी बाळगली पाहिजे –
1) फक्त 1 थेंब हॅन्ड सॅनिटायझर घेऊन ते जोपर्यंत पूर्णपणे सुकून जात नाही तोपर्यंत हाथ धुणे.
2) सॅनिटायझर लहान मुलांचा हात सहज जाईल अशा ठिकाणी ठेऊ नका.
3) तुमच्या मुलांना हॅन्ड सॅनिटायझर वापरल्यावर हात तोंडाला किंवा इतर धुळीच्या ठिकाणी ठेऊ नको असे सांगा.
असे सर्वे उपाय असेल तरी नवजात बालकांसाठी सॅनिटायझर वापरणे योग्य आहे का? असा प्रश्न कायम आहे. यावर असं बोललं जातंय की, नवजात बालकांसाठी सॅनिटायझर वापरू नका. कारण लहान बाळ स्वतःहून कुठेही फिरण्यासाठी जाऊस शकत नाही. तसेच खेळण्यासाठी जाऊ शकत नाही, त्यामुळे पालकांनी खालील काळजी घेतली पाहिजे.
1) बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुऊन लहान मुलांना उचलून घेतले पाहिजे.
2) त्यांची खेळणी किंवा लादी, त्यांची अंथरूण हे स्वच्छ ठेवा. कापडी खेळणी असतील आणि ती जर धुता येत असतील तर कोमट पाण्याने धुऊन घ्या.
3) हॅन्ड सॅनिटायझर वापरून लगेच त्यांचा संपर्कात आलात तर ते लहान बाळ आपला हात चाटणार नाही यांकडे लक्ष ठेवा.
कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना मीनाक्षी खांडेकर यांनी ही माहिती दिली.





























































