
> दिवसभरातील ११ तास केवळ बैठे काम करत असाल, तर पुढच्या तीन वर्षांत तुमचे आयुष्य ५० टक्क्यांनी कमी होणार ही खूणगाठ मनाशी बांधून घ्या.
> आपल्या शरीरात एवढी उष्णता असते की तेवढ्या उष्णतेने दीड लिटर पाणी उकळवता येऊ शकते.
> माणूस मुळीच न खाता काही आठवडे जिवंत राहू शकतो, पण झोपेशिवाय केवळ ११ दिवसच राहू शकाल.
> माणसाच्या मेंदूमध्ये थोडी तरी वीज असते. तेवढी वीज १० वॅट्सचा बल्ब प्रकाशमान व्हायला पुरेशी ठरते.
> सफरचंदाचे इतके प्रकार आहेत की प्रत्येक प्रकार दररोज एकेक करून खायचा म्हटला तरी २० वर्षे सहज निघून जातील.
> पोटातील अॅसिड इतके प्रखर असते की त्यात चक्क रेझर ब्लेडही विरघळू शकेल.
> इंटरनेटवरील विकिपेडीयावर जेवढी माहिती नोंदविलेली आहे त्याच्या पाच पटीने जास्त माहिती साठवण्याची क्षमता माणसाच्या मेंदूत असते.
> धूम्रपानामुळे जो वाईट परिणाम माणसाच्या आरोग्यावर होत असतो, तसाच परिणाम आळस आणि अक्रियाशील राहिल्यामुळे माणसावर होतो.































































