चिरतरूण राहण्यासाठी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तरुण राहायला कुणाला आवडणार नाही…? पण त्यासाठी योग्य जीवनशैली आणि समतोल आहार महत्त्वाचा असतो. याबरोबरच काही खाद्यपदार्थांच्या सेवनाने माणूस चिरतरूण राहू शकतो. असाच एक पदार्थ म्हणजे खाण्याचा डिंक… 

तरुण राहण्यासाठी हा खाण्याचा डिंक खूपच फायद्याचा ठरतो. आता दूध हे आपल्या आरोग्यासाठी किती आवश्यक आणि किती महत्त्वाचे ते वेगळं सांगायला नको. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनीही रोज फक्त एक ग्लास दूध प्यायलाच हवे. त्यात खाण्याचा डिंक मिसळून ते प्याल तर आणखी उत्तम.

  • खाण्याचा डिंकाला कुठलीही चव नसते की त्याला कसलाही गंध नसतो. पाण्यातही तो चटकन विरघळतो. खाण्याचा हा डिंक पांढर्‍या आणि पिवळ्या रंगात मिळतो. झाडामधून निघालेले हे कोरडे खायचे डिंक अनेक पोषक तत्वांनी भरपूर असतात.
  • दुधात सोबत डिंक खाल्ल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढते. या दोन्ही प्रकारच्या क्षमता वाढल्या की थकवा दूर होतो.
  • दुधामध्ये खाण्याचा डिंक मिसळून खाण्याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना हमखास होतो. वय वाढले की झोप कमी होते. काहीजणांना तर अजिबात झोप येत नाही. पण याच ज्येष्ठांनी जर रात्री झोपण्याच्या केळी दुधामध्ये डिंक मिसळून प्यायले तर छान झोप तर लागतेच, पण शरीराला आराम मिळून ताजेतवानेही वाटते.
  • दुधात खाण्याचा डिंक मिसळून रोज प्यायल्याने पचनक्रियाही व्यवस्थित राहाते. त्यामुळे मग बद्धकोष्ठतेची समस्या नाहीशी होते.
  • या डिंकात प्रथिने आणि फॉलिक एसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्त वाढते.
  • खाण्याचा डिंक आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढकतो. हे दोन पदार्थ एकत्र आल्यामुळे ते एक चांगले हेल्थ ड्रिंक बनते.
  • दूध आणि खाण्याचा डिंक एकत्र खाल्ल्यास तणाव दूर राहतो. त्यामुळे तणाव दूर करण्याचा तो एक उत्तम उपाय आहे.
  • खाण्याचा डिंक, दुध आणि मेहंदीचे फुल वाटून पिण्यामुळे डोकेदुखीची समस्या दूर होते.
  • या खास पेयामुळे प्रजननक्षमतेतही वाढ होते आणि शुक्राणूंची संख्या काढते.