Tips : वजन वाढवायचं आहे? या 10 फळांचं करा सेवन

वाढतं वजन हा अनेकांना भेडसावणारा प्रश्न आहे. मात्र त्याचं दुसरं टोक आहे कृश शरीर. असेही अनेक लोक आहेत ज्यांचं शरीर म्हणजे पाप्याचं पितर. कृश किंवा अत्यंत बारीक शरीर देखील योग्य नाही. तेव्हा वजन व्यवस्थित असणे गरजेचे आहे. वजन वाढवण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणजे योग्य आहार आणि फळांचे सेवन. 10 फळं अशी आहेत ज्याचं प्रमाणात सेवन केल्यास ती वजन वाढवण्यास मदत होते. प्रत्येक व्यक्ती, त्याची शरीर प्रकृती यानुसार आहार बदलतो. त्यामुळे या फळांचे सेवन सुरू करण्याआधी वैद्यकीय सल्ला हा अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय थेट या फळांचे सेवन चालू करू नये.

केळ

banana

वजन वाढवण्यासाठी सर्वात पहिला पर्याय केळ आहे. हे पौष्टिक आहेच पण सोबतच कार्ब्स आणि कॅलरी यामध्ये असतात. मध्यम आकाराच्या एका केळ्यात 105 कॅलरी, प्रोटीन 1 ग्रॅम, कर्बोदक 27 ग्रॅम, फायबर 3 ग्रॅम आणि 26 टक्के विटामिन B6 असते. ओटमील, स्मूदी, योगार्ट किंवा मधासोबत केळ सेवन केल्यास वजन वाढण्यास त्याचा फायदा होईल.

नारळ

coconut

नारळ अत्यंत गुणकारी आहे. कॅलरी, फॅट्स आणि कार्बोहाड्रेट्स चांगल्या प्रमाणात आढळतात. वजन वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. 28 ग्रॅम नारळात 99 कॅलरी, 1 ग्रॅम प्रोटीन, 4.3 ग्रॅम कर्बोदक, 2.5 ग्रॅम फायबर, 17% मॅगनीज आणि 5% सेलेनियम मिळते. फ्रूट सलाड किंवा स्मूदी सारखेही याचे सेवन करता येते.

आंबा

mango

आंबा अत्यंत चवदार फळ आहे. आंब्यातून मोठ्या प्रमाणात कॅलरी मिळतात. एक कप (165 ग्रॅम) आंब्यात 99 कॅलरी, 1.4 ग्रॅम प्रोटीन, 0.6 फॅट्स, 25 ग्रम कर्बोदक, 3 ग्रॅम फायबर, 67 % विटामिन C आणि 18 % फॉलेट मिळते. यासह आंब्यातून विटामिन B, A आणि E देखील मिळते.

एवोकाडो

avocado

एवोकाडोमध्ये अत्यंत पोषक तत्त्व असतात. यामध्ये कॅलरी आणि हेल्दी फॅट्स अधिक असतात. या फळातून विटामिन K,C आणि B5-B6 मिळते.

सुका मेवा सुका मेव्यात पाणी नसते. छोट्या आकारातील सुका मेव्यात अनेक पौष्टिक तत्त्वे असतात. यात नैसर्गिक साखर (नॅचरल शुगर) अधिक प्रमाणात असते. म्हणून हे पदार्थ फॅट् अथवा प्रोटीन सोबत सेवन केले पाहिजे. जाणून घेऊया या सुक्या मेव्याबद्दल.

सुकवलेले जर्दाळू

apricot

जर्दाळू हे अत्यंत चविष्ट असून ते ताजे किंवा उन्हात सुकवलेले अशा दोन्ही प्रकारे सेवन केले जातात. यात 67 कॅलरी, 0.8 ग्रॅम प्रोटीन, 0.1 ग्रॅम फॅट्स, 18 ग्रॅम कर्बोदक, 2 ग्रॅम फायबर, 6 टक्के विटामिन A आणि 8 टक्के विटामिन E मिळते. कॅलरीसह यात बीटा कॅरोटीन देखील चांगल्या प्रमाणात असते. वजन वाढवण्यासाठी हे चीज सोबत सेवन करावे.

सुकवलेले अंजीर

dry-anjeer

ताजे आणि सुकवलेले अंजीर दोन्ही चविष्ट लागतात. हे ओट्स, योगर्ट किंवा सलाडसोबत सेवन करू शकतात. काही लोक पाण्यात उकलून त्याचे सेवन करतात.

खजूर

dates

पश्चिमेकडील देशांमध्ये खजूर अधिक प्रमाणात आढळतो. खजूर पोषक तत्त्वांनी भरलेला असतो. कॉपर, मॅगनीज, लोह आणि विटामिन B6 चा स्त्रोत म्हणून खजून अत्यंत आवश्यक मानला जातो. कॅलरीज अधिक प्रमाणात मिळवण्यासाठी याचे सेवन आलमंड बटर आणि नारळासोबत करावे.

काळे मनुके

black-kishmish

काळे मनुके सर्वसाधारणपणे छोट्या आकाराचे आणि गोड असतात. आकाराने छोटे असले तरी अत्यंत गुणकारी, पोषक तत्त्वांनी हे भरलेले आहेत. कॅलरीचे प्रमाण वाढवण्यासाठी दही, स्टफिंग आणि बेक्ड फूडसोबत खाणे जास्त योग्य ठरते.

मनुके (किशमिश)

kishmish

हे मनुके विविध आकारात आणि रंगात आढळतात. मनुक्यातून कॅलरी, प्रोटीन, कर्बोदक, पोटॅशिअम, लोह, फॅट्स मिळतात. याच्या सेवनानने कॅलरी वाढतात आणि हळूहळू वजन वाढण्यास देखील सुरुवात होते.

सुकवलेला आलूबुखार

alubukhara

पोषणतत्त्वांनी भरपूर अशा सुकवलेल्या आलूबुखाराचे अनेकजण वजन वाढवण्यासाठी सेवन करतात. यामध्ये कॅलरी, प्रोटीन, फॅट्स, कर्बोदक, फायबर, विटामिन, पोटॅशियम आढळते. बद्धकोष्ठता कमी करण्यास या फळाचा उपयोग होतो.

आपली प्रतिक्रिया द्या