चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस, शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण

चंद्रपूरमध्ये मुळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकर्‍यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

चंद्रपूरमध्ये आज दुपारी कडक उन्हाळ्यासारखे ऊन होते. मात्र 4 वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात काळे ढग भरून आले. ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. अचानक आलेल्या या वृष्टीने नागरिकांची त्रेधा उडाली. मुसळधार पावसाने रस्त्यावरील वाहतूक देखील मंदावली. पूर्ण जून महिना अल्पवृष्टीचा गेल्यानंतर  आलेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या