नाशकात मुसळधार पाऊस, रामकुंडात अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात यश

नाशिकमध्ये आज मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत होती. यावेळी नदी पात्रातील रामकुंड परिसरात दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी वाहत होते.

या वेळी एक तरुण रामकुंडात अडकला होता. अर्धा तास हा तरुण रामकुंडातील सिमेंटच्या खांबाला धरून उभा होता. तेव्हा रेस्क्यु टीमने या तरुणाला वाचवले आहे.

गंगापूर धरणातून 4 हजार 656 क्युसेक वेगाने गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे गोदावरी नदीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.