
सामना प्रतिनिधी । उरण
मागील तीन दिवसांपासून उरणमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. मूसळधार पाऊसामुळे काही ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली.
मूसळधार पावसामुळे उरण येथील बोकडवीरा गावातील रहिवासी जयवंत रोहिदास डाकी यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. केगाव येथे झाड कोसळल्याने त्या ठिकाणच्या काही घरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.
रांजणपाडा येथील गावात पावसाचे पाणी शिरले असल्याची माहिती तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली. जोरदार पावसामुळे मोरा भाऊचा धक्का दरम्यानची सागरी प्रवासी वाहतूकही संध्याकाळ नंतर बंद करण्यात आली होती.





























































