
रस्त्याच्या मधोमध बंद पडलेला ट्रक… एकामागोमाग एक 25 हून अधिक वाहनांचे तुटलेले क्लचप्लेट… त्यातच बेशिस्त वाहनचालकांनी वाट काढण्यासाठी आडव्या-तिडव्या टाकलेल्या गाडय़ा… यामुळे आज एक्स्प्रेस वेवर व मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर तुफान ट्रफिककोंडी झाली. त्यामुळे वीकेण्डची मजा लुटण्यासाठी कुटुंबकबिल्यासह निघालेले मुंबई, ठाणेकर सहा किलोमीटर लागलेल्या वाहनांच्या रांगेत अडकले. लोणावळा, खंडाळा ट्रॅफिकने ‘कंटाळा’ अशीच काहीशी अवस्था प्रत्येकाची झाली होती.





























































