वरळीचा युवा क्रिकेटपटू वेदांत मुरकरला शिवसेनेचा मदतीचा हात

सामना ऑनलाईन, मुंबई

वरळी कोळीवाडा येथे राहणाऱ्या 17 वर्षीय वेदांत मुरकर 12 ते 18 सप्टेंबर या कालावधीत लखनऊमध्ये होणाऱ्या हिंदुस्थान अंडर 19 ए, हिंदुस्थान अंडर 19 बी, अफगाणिस्तान आणि नेपाळ या तीन देशांच्या क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थान अंडर 19 बी या टीमचा कर्णधार म्हणून निवड झाली आहे. वरळीचे शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी वेदांतच्या घरी भेट देऊन त्याचे अभिनंदन केले व त्याला पन्नास हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश त्यांच्या पालकांसह त्याला सुपूर्द करीत यशासाठी शुभेच्छा दिल्या.

आर्थिक अडचणीमुळे वेदांतला अनेक मर्यादा येत आहेत वरळी कोळीवाडय़ातील अवघ्या 10 बाय 10 फुटांच्या घरामध्ये राहणाऱ्या वेदांतचे स्वप्न कितीतरी मोठे आहे. वेदांतची आई गृहिणी असून व वडील एका खासगी कंपनीत काम करतात. आमदार सुनील शिंदे यांनी केलेल्या आर्थिक मदतीसाठी वेदांत आणि त्यांच्या पालकांनी आमदार शिंदे आणि शिवसेनेचे आभार व्यक्त केले आहे. यावेळी शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी, शाखा समन्यक शेखर कीर, खामगाव संपर्कप्रमुख-भालचंद्र मेस्त्राr, उपशाखाप्रमुख सुनील बोन्द्रs, बाबू गंगावणे, दत्ता नागवेकर, बंडय़ा रागणकर, मनीष पवार व शिवसैनिक उपस्थित होते.