हेरिटेज मंदिरात बनावट मूर्ती, काशी विश्वेश्वर मंदिराच्या ट्रस्टींना अटकपूर्व जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माहीमच्या काशी विश्वेश्वर मंदिरातील मूर्ती गहाळ झाल्याच्या आरोपाप्रकरणी तसेच बनावट मूर्ती वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या मंदिराच्या चार ट्रस्टींना सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायाधीश जी. बी. गुरव यांनी वयोवृद्ध असलेल्या ट्रस्टींचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

 तसेच याबाबत धर्मदाय आयुक्तांकडे व पोलीसांकडे खोटा दस्तावेज सादर केल्याने मंदिराचे विश्वस्त जयवंत देसाई, पद्माकर सहानी, शैला पाठारे आणि संजीव पराळकर यांच्या विरोधात माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी अटक होऊ नये यासाठी विश्वस्तांनी ऍड. कुलदीप पाटील, ऍड. सायली नरेश धुरु, ऍड. चैतन्य पेंडसे, ऍड. राजेंद्र शिरोडकर, ऍड. अर्चित साखळकर, ऍड. निहार गर्ग यांच्या मार्फत सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्यावर न्यायाधीश जी. बी. गुरव यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्त्यांची बाजू ग्राह्य धरत अटकपूर्व जामीन मंजूर केला.