चेंजिंग रूममध्ये महिला डॉक्टरांचे व्हिडीओ बनवायचा आरोग्य कर्मचारी, पोलिसांनी केली अटक

बंगळुरुमधील एका रुग्णालयात महिला डॉक्टरांच्या चेंजिंग रूममध्ये छुपा कॅमेरा लावून व्हिडीओ बनविल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हे व्हिडीओ बनवणारा आरोपी याच रुग्णालयाचा आरोग्य कर्मचारी असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेला माहितीनुसार, येथील संजय गांधी ट्रामा आणि ऑर्थोपेडिक्स रुग्णालयात एक महिला सर्जन ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी चेंजिंग रूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना तिथे एक मोबाईल फोन दिसला, जो रेकॉर्डिंग मोडवर होता. या महिला डॉक्टरने तातडीने इतर डॉक्टरांना याबाबत माहिती दिली. यानंतर रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले. याबाबत तपास केला असता हा मोबाईल याच रुग्णालयात आरोग्य कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या मारुतेशा नावाच्या एका व्यक्तीचा निघाला.

रुग्णालयातील महिला डॉक्टारांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार केली. यानंतर महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवल्या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी या आरोपीची चौकशी केली असता त्याने हे व्हिडीओ अद्याप कुठेही अपलोड व शेअर केले नसल्याची माहिती दिली. आरोपीने आतापर्यंत किती महिलांचे असे अश्लील व्हिडीओ बनवले आहेत, याचा पोलीस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या