‘हिजबुल’साठी काम करणाऱ्या चौघांना अटक

490

हिजबुल मुजाहिदीनसाठी काम करणाऱया चौघांना सुरक्षा दलानी आज अटक केली. हे चौघेही सोपोरमध्ये असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी संयुक्तपणे मोहीम राबवत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हत्यारे आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. त्यांची चौकशी सुरू असून त्यातून महत्त्वाच्या गोष्टी हाती लागतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कश्मीरच्या कुपवाडा जिल्हय़ातील हंदवाडामध्ये काही दिवसांपूर्वी ‘लष्कर-ए- तोयबा’साठी काम करणाऱया दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून तीन हातबॉम्ब जप्त करण्यात आले होते. ते हंदवाडातील रहिवासी होते. दहशतवादी संघटनांसाठी माहिती काढणे, त्यांच्यासाठी पैसा, हत्यारे आणि लपण्यास सुरक्षित ठिकाणे शोधणे हे त्यांचे काम होते.

आपली प्रतिक्रिया द्या