देशातील सर्वात उंचीवरील नागरिकांना पोचले नळाने पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमाचल प्रदेशातील शीत वाळवंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पिती खोऱ्यातील टशिगंज या देशातील सर्वात उंचीवरील (15,256 फूट) मतदारसंघात नळाने पाणी पुरवण्याची योजना सुरु झाली आहे. चीन सीमेला लागून असलेल्या या भागाला केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जल योजनेतून पाईपने घरोघरी पाणी पोचवण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. पूर्वी पर्वतीय भागात बर्फ वितळवून ते पाणी खेचरावर लादून 15 हजार फूट उंचीवरील गावांत न्यावे लागायचे. नव्या नळ पाणी योजनेमुळे टशिगंजकासियांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. कारण आता पहाडाच्या पायथ्याजवळून पाणी उंचावर नेण्याची जीवघेणी कसरत त्यांना करावी लागणार नाही. लाहौल स्पिती खोऱयातील पहाडी भागात राहणाऱया नागरिकांसाठी ही नळ पाणी योजना अतिशय लाभदायक ठरणार आहे.