
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च पंपनीने 24 जानेवारीला जाहीर केलेल्या अहवालाचा अदानी शेअर्सवर नकारात्मक परिणाम सुरूच राहिल्यामुळे शेअर बाजारात आणलेला 20 हजार कोटींचा एफपीओ अखेर रद्द करण्याचा निर्णय आज अदानी समूहाने रात्री उशिरा घेतला. एफपीओमध्ये गुंतवलेले पैसे गुंतवणूकदारांना परत केले जाणार आहेत. अदानी समूहाच्या या निर्णयामुळे आर्थिक विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
अदानी समूहाने 25 जानेवारीला अदानी एंटरप्रायजेज याचा एफपीओ जारी केला होता. गुंतवणूकधारकांना त्यात 31 जानेवारीपर्यंत पैसे गुंतवण्याची संधी दिली होती, पण हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी एंटरप्रायझेसच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत एफपीओ रद्द घेण्याचा निर्णय घेतला. 1994 साली अदानी समूहाने आपला आयपीओ बाजारात आणला होता. त्यानंतर 29 वर्षांनंतर व्यवसायवाढीसाठी पंपनीने पुन्हा आपले शेअर्स एफपीओच्या माध्यमातून 25 जानेवारीला विक्रीला काढले. मात्र, हिंडेनबर्गने 24 जानेवारीला आपला अहवाल सोशल मीडियावर जारी केल्यामुळे अदानी समूहाचे शेअर्स पहिल्याच दिवशी 28 टक्क्यांनी आपटले, तर एफपीओमध्ये केवळ 1 टक्के गुंतवणूक झाली.
सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत एफपीओतील गुंतवणूकदारांचे पूर्ण पैसे परत केले जाणार आहेत. गुंतवणूकदारांच्या हितासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे अदानी समूहाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हिंडेनबर्ग अहवालात काय…
हिंडनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहाने शेअर मार्पेटमधील आकडेवारीमध्ये जाणीवपूर्वक फेरफार केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे बुधवार, 25 जानेवारीपासून अदानी समूहाच्या 9 पंपन्यांच्या शेअर्समध्ये 28 टक्क्यांची घसरण सुरू झाली. ही घसरण आजही सुरू असून अदानी समूहाचे आतापर्यंत 46 हजार 86 कोटींहून जास्त नुकसान झाले आहे.

























































