कॅनडामध्ये हिंदूंना खलिस्तानी समर्थकांची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खलिस्तानवादी अतिरेकी संघटनांनी 5 एप्रिल 2026 रोजी दोन मोठ्या हिंदू मंदिरांबाहेर ‘खलिस्तान झिंदाबाद’ रॅली आणि निदर्शने करण्याची उघडपणे धमकी दिली आहे. खलिस्तान समर्थक ब्रॅम्प्टन येथील त्रिवेणी मंदिर आणि सरे येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिराला लक्ष्य करत आहेत. आमची मंदिरे पूजेची पवित्र स्थळे आहेत, ती निदर्शनांची मैदाने नाहीत. आम्ही धमक्यांपुढे झुकणार नाही, असे हिंदू कॅनेडियन फाऊंडेशनने तत्काळ निवेदन जारी करून म्हटले आहे.