काँग्रेस-राष्ट्रवादीची सोमवारी हिंगोली जिल्हा बंदची हाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

केंद्र आणि राज्य सरकारच्या महागाईने सर्वसामान्य जनता होरपळत असुन वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व समविचारी पक्षाच्या वतीने दि. 10 सप्टेंबर रोजी सोमवारी जिल्हा बंदची हाक दिली आहे. जिल्ह्यातील व्यापार्‍यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सहकार्य करण्याचे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, कार्याध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केले आहे.

देशातील व राज्यातील वाढती महागाई पाहता सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून, दुदैवाची बाब म्हणजे केंद्र सरकार व राज्य सरकार यावर मौन पाळुन आहेत. या कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला खडबडून जागे करण्यासाठी जिल्ह्यातील खासदार राजीव सातव, आमदार संतोष टारफे, माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रवादीचे दिलीप चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येणार आहे. तसेच हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 वाजता निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने जनतेचा आवाज केंद्र व राज्य शासनापर्यंत पोहचविण्यसाठी व जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नावर सोमवार दि.10 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने हिंदुस्थान बंदची हाक देण्यात आली आहे. महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनता, व्यापारी, सामाजीक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवुन सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवावा असे आवाहन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.