खांडेगाव पाटीजवळील अपघातात तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। वसमत

वसमत तालुक्यातील खांडेगाव पाटीजवळ मंगळवारी अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 29 वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर माणिकराव बारसे (29 ) असे त्याचे नाव आहे. दरम्यान अपघातानंतर फरार झाल्ल्या चालकाचा पोलीस शोध घेत आहे.

वसमत तालुक्यातील खांडेगाव येथील खांडेगाव पाटीजवळून ज्ञानेश्वर गावाकडे जात होता. त्याचवेळी अचानक मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यामुळे ज्ञानेश्वर दूरवर फेकला गेला. त्यानंतर अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे फौजदार दिगंबर कांबळे,पोलीस कर्मचारी निवृत्ती बडे,आदी घटनास्थळी दाखल झाले. नंतर ज्ञानेश्वर यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ज्ञानेश्वर याची तीन एकर जमीन आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,एक मुलगा,दोन मुली असा परिवार आहे. त्याच्या अपघाती मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.