हेरिटेज ‘माइल स्टोन’चा ‘क्यूआर कोड’ दाखवणार ऐतिहासिक मार्ग, पालिकेकडून 15 ‘मैलाच्या दगडां’चे संवर्धन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटिशकाळात मुंबईच्या रस्ते वाहतुकीचे महत्त्वाचे दिशादर्शक ठरणाऱ्या ‘माइल स्टोन’करील ‘क्यूआर कोड’ आता मुंबईकर-पर्यटकांना ऐतिहासिक मार्ग दाखवणार असून महत्त्व-माहितीही सांगणार आहेत. यासाठी पालिकेच्या हेरिटेज विभागाकडून जतन-संवर्धन करण्यात आलेल्या 15 ‘माइल स्टोन’कर ‘क्युआर कोड’ बसवण्यात आले आहेत. हा ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर पालिकेची वेबसाइट आणि हेरिटेज सेलला कनेक्ट होऊन, ‘माइल स्टोन’ची माहिती मिळेल.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मैलाच्या दगडांना पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यात आले आहे. पालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाकडून हे काम करण्यात येत आहे. ब्रिटिशकाळात मुंबईच्या हॉर्निमल सर्कल जवळील सेंट कॅथड्रल थॉमस चर्च येथून मुंबई सुरू व्हायची. या ठिकाणाहून मुंबईत जाण्यासाठी घोडागाडी, बैलगाडय़ा सुटायच्या. या ठिकाणी ’झिरो’ मैलपासून मुंबईच्या पुढील मैला-मैलावर हे बेसॉल्टचे पंचकोनी दगड लावण्यात आले होते. यात शीव टँक, किल्ला येथे शेवटचा मैलाचा दगड आहे. हेरिटेज ग्रेड-वन म्हणून नोंद होणारे हे मैलाचे दगड मुंबईचा जसजसा विकास होत गेला, वाहतुकीची साधने बदलली तसतसे दिसेनासे झाले. मात्र एकेकाळी अंतर मोजण्यासाठी महत्त्वाचे निशाण असलेल्या दगडांना पालिकेच्या हेरिटेज विभागाकडून मूळ रूप देण्यात आले आहे. या ठिकाणी मुंबईकर-पर्यटकांना सेल्फीही घेता येणार आहे.

 ‘माइल स्टोन’च्या संवर्धनाच्या उपक्रमात सुरुकातीला मूळ स्वरुपातील केवळ 9 माइल स्टोन सापडले होते, मात्र पालिकेच्या हेरिटेज विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे सापडत नसलेले 2 माइल स्टोन सापडले. तर चार माइल स्टोन नव्याने तयार करून बसवण्यात आले.