
टेम्पो बाजूला घेण्याच्या वादातून एमएससीबी कामगाराला मारहाण करून गंभीररित्या जखमी करून फरार झालेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट दोनने अटक केली. ही घटना 26 मार्चला पिसोळी परिसरात घडली होती. करण दशरथ भोसले (वय 25, पालखुर्दता. वेल्हा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अक्षय नवणे असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. स्वप्नील मासाळ (वय 31 रा पिसोळी) यांनी फिर्याद दिली आहे.
स्वप्नील मासाळ हे एमएससीबीचे ठेकेदार असून अक्षय नवणे त्यांच्याकडे कामाला आहे. 26 मार्चला पिसोळी परिसरात जमिनीखालून केबल टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी टेम्पो रस्त्यात असल्याच्या कारणावरून टोळक्याने अक्षयला बेदम मारहाण केली होती. यातील सराईत करण फरार झाला होता.
तो आंबेगाव पठार परिसरात येणार असल्याची माहीती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, एपीआय विशाल मोहीते, उपनिरीक्षक संजय गायकवाड, यशवंत आंब्रे, अस्लम पठाण, नामदेव रेणुसे, संजय जाधव, नागेश राख यांनी केली.




























































