एनआरसी आणि एनपीआरबाबत अमित शहांचे मोठे विधान, म्हणाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिक सुधारणा कायदा (सीएए) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) वरून देशभरात आगडोंब उसळला आहे. अशातच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय जनगणना नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्याची मंजूरी दिली. एनपीआरमुळे देशातील नागरिकांची नोंदणी अद्ययावत होणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे सांगिण्यात आले. आधीच सीएएम व एनआरसी आणि आता एनपीआरची त्यात भर पडल्याने लोकं संभ्रमावस्थेत असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एनआरसी आणि एनपीआरचा परस्पर संबंध नसल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) आणि राष्ट्रीय जनगणना नोंदणी (एनपीआर) यांचा परस्पर संबंध नाही. याबाबत विरोधकांकडून अफवा पसरवल्या जात आहेत, असे अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, दर दहा वर्षांनी देशातील नागरिकांची जनगणना केली जाते, त्यामुळे यात विशेष अशी काहीही बाब नाही.

एनपीआर आणि एनसीआरबाबत काही लोक अकारण भिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. एनपीआर, एनसीआर आणि सीएएवरून लोक संतापले. कारण त्यांची माथी भडकवण्यात आली. काँग्रेस या कायद्याचे राजकारण करत आहे असाही आरोप अमित शाह यांनी केला.

जनगणना नोंदणीसाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही – जावडेकर

एनआरसीबाबत दिले स्पष्टीकरण
मुलाखतीदरम्यान अमित शहा यांनी एनआरसीबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. एनआरसी संपूर्ण देशात लागू होणार की काही भागात लागू होणार याबाबत सध्यातरी चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची बैठक आणि संसदेतही यावर चर्चा झालेली नाही. याबाबत वाद घालण्याची आवश्यकता नाही, असे अमित शहा म्हणाले.

डिटेंशन सेंटर आणि एनआरसी-सीएएचा संबंध नाही
डिटेंशन सेंटर आणि एनआरसी-सीएएचा संबंध नसल्याचे अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारचे डिटेंशन सेंटर प्रत्येक देशात असतात. एखादा दुसऱ्या देशाचा व्यक्ती अवैधरित्या राहात असल्यासर त्याला त्या सेंटरमध्ये ठेवण्यात येते. परंतु याबाबत अफवा पसरवल्या जात जात आहेत, असेही शहा म्हणाले.