ब्रेकिंग न्यूज: पाकिस्तानात दोन नाही ‘तीन वेळा’ घुसून केले हल्ले- राजनाथ सिंह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rajnath-singh-hm-karnataka

सामना ऑनलाईन । बेंगळुरू

हिंदुस्थानी सैन्याने आपल्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात घुसून घेतल्याचे साऱ्या जगाला माहीत आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत हिंदुस्थान सैन्य दोन नाही तर तीन वेळा पाकिस्तानात घुसले होते असा गौप्यस्फोट केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह यांच्या या विधानामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

कर्नाटकातील मंगळुरू येथील एका सभेला संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या पाच वर्षांत हिंदुस्थानने तीन वेळा पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक केले आहे. दोन स्ट्राईक्स तुम्हाला माहीत आहेत. पाकिस्तानच्या भूमीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी उरी येथे रात्री आमच्या देशातील 17 सैनिकांवर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी सैन्याला सूट देण्यात आली आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आली. तिकडे हाहाकार उडावला. तो पहिला स्ट्राईक होता. तसेच नुकताच पुलावामात दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर आपण हवाई हल्ला केला. पण पाकिस्तानात घुसून केलेल्या तिसऱ्या स्ट्राईकची माहिती मी तुम्हाला देणार नाही, असे विधान राजनाथ सिंह यांनी केले आहे.