
मुंबईत पोक्सो न्यायालयाने लैंगिक छळ प्रकरणी एका तरुणाची निर्दोष मुक्तता केली आहे. एका अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला प्रेमाची मागणी घालणे म्हणजे लैंगिक छळ नाही असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
2017साली आरोपीने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरून प्रपोज केले होते. तेव्हा तरुणाला पोक्सो अंतर्गत अटक करण्यात आली होती.
तरुणाने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करण्याच्या हेतूने काही केले नाही, तसे पुरावे नाहीत असे कोर्टाने म्हटाले आहे. तरुणाने लैंगिक छळाच्या हेतूने मुलीचा पाठलाग केला नाही किंवा तशी वागणूक केली नाही, तसेच मुलीवर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही. त्यामुळे कोर्टाने या तरुणाची निर्दोष मुक्तता केली आहे.






























































