
होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. कोकण कासियांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटीने 3 मार्च ते 12 मार्चपर्यंत तब्बल 250 जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून हजारो कोकणवासीय होळी सणानिमित्त रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिह्यात जातात. मात्र अनेकांनी रेल्केचे बुकिंग मिळत नाही. तसेच खासगी बस चालक अवाच्या सवा भाडे वसूल करतात. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने नियमित गाडय़ांव्यतिरिक्त 250 जादा गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. सदरच्या गाडय़ा मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा, पनवेल येथील बसस्थानकांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतकाडी, मालवण आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांना एसटी महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेत स्थळाबरोबरच MsrtcMobile Reservation App वरूनही आगाऊ बुकिंग करता येणार आहे.