
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात चार टप्प्यांमध्ये निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पहिल्या टप्प्यासाठी 11, दुसऱ्या टप्प्यासाठी 18, तिसऱ्या टप्प्यासाठी 23 आणि चौथ्या टप्प्यासाठी 29 एप्रिल या दिवशी संबंधित मतदारसंघात राज्यात सार्वजनिक सुट्ट्याजाहीर करण्यात आल्या आहेत.






















































