सलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली

458

शनिवार व रविवार आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमध्ये साईंच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली असून साईनगरीचे रस्ते साईभक्तांनी फुलून गेले आहेत. यामुळे इनेक ठिकाणी वाहतूकीची कोंडी पाहावयास मिळाली.

दररोज 25 हजार भाविक साई दर्शनाला हजेरी लावतात मात्र सलग दोन दिवस सुट्टी आली की. शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असून काल व आज साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. शनिवारी दिवसभरात 60 हजार भाविकांनी साईंच्या समाधीच दर्शन घेतलं तर रविवार सुट्टीचा मुख्य दिवस असल्यान ही संख्या लाखाच्या घरात गेली साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. वाढलेल्या गर्दीत अनेक ठिकाणाहून आलेल्या पायी पालख्यांची भर पडत असून सर्वसामान्य भक्तांच्या सुलभ दर्शनासाठी काही काळासाठी व्हीआयपी दर्शन सुविधा बंद ठेवण्यात आले होते. साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदूमून गेली.

अचानक झालेल्या या गर्दीमुळे संस्थान व्यवस्थापनावरही मोठा ताण पडलेला दिसत आहे तर वाहनतळ व प्रसादालयातही प्रचंड गर्दी झाली होती. अचानक झालेल्या या गर्दीमुळे व्यावसायीकांनीही समाधान व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या