
होमलोन घेतले असेल आणि लोनचे हफ्ते नियमित भरणं शक्य होत नाही, तेव्हा ते डिफॉल्ट होते. तुम्ही लोन परत करू शकला नाहीत, तर भविष्यात इतर कुठलेही लोन मिळत नाही.
सर्व बँका आणि एनबीएफला EMI न भरू शकल्यास त्याचा अहवाल सिबिल (CIBIL) इक्विफैक्ससारख्या व्रेडिट ब्यूरो द्यावा लागतो.
रिपोर्ट केल्यानंतर ते तुमचा सिबिल स्कोर कमी होतो आणि त्यामुळे भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्रेडीट/ कर्ज मिळणे अवघड होईल.
अशा परिस्थितीत बँकेकडून तुमच्या घरावर जप्ती आणली जाते. बचत केलेल्या पैशांची बँकेत किंवा पोस्टात जर एफडी केलेली असेल तर ही एफडी तोडूनदेखील बँकेचे हप्ते भरू शकता.
जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कोणतीही बँक पर्सनल लोन देते. तुम्ही पर्सनल लोन घेऊनदेखील तुमच्या घराचा थकीत ईएमआय भरू शकता.




























































