एचडीएफसी बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा

एचडीएफसी बँकेने नव्या वर्षाआधीच आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने एमसीएलआरच्या दरात 0.25 टक्के कपात केल्याची घोषणा केली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे बँकेचा नवीन एमसीएलआर दर 8.30 ते 8.55 टक्के झाला आहे. यामुळे ज्या कर्जदारांचे लोन एमसीएलआर, आरएलएलआर किंवा आरबीएलआरशी जोडलेले आहे, त्यांना फायदा होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वी रेपो रेटमध्ये कपात केल्याने बँका आपल्या एमसीएलआरच्या दरात कपात करत आहेत.