
देशातील कोळसा टंचाईचा औष्णिक वीज निर्मितीवर विपरित परिणाम होऊ लागला आहे. त्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी पेंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह, कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या (एनटीपीसी) अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये कोळसा टंचाईमुळे ओढवलेल्या विजेच्या संकटावर चर्चा झाली.
कोळसा टंचाईच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी लोडशेडिंगचा इशारा दिला आहे. त्याची दखल घेत केंद्र सरकारने ऊर्जा आणि कोळसा मंत्र्यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.




























































