
हवामानातील बदल, प्रदूषण, फ्लू इत्यादि अनेक कारणांमुळे हल्ली कोरडा खोकला होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वेळा हा खोकला अनेक दिवस राहतो किंवा फक्त झोपल्यानंतरच येतो. त्यामुळे रात्रभर झोप येत नाही. यामुळे दिवसभरातील कोणतीही कामे करताना अडथळे येताते. शिवाय खोकल्याचे सिरप, औषधे घेतल्याने कोरडा खोकला बरा होतोच असे नाही. फ्लू किंवा सर्दी झाल्यानंतर सुरू झालेला कोरडा खोकला अनेक दिवस राहतो. कोरडा खोकल्याचा त्रास होत असेल आणि कोणत्याही प्रकारचे औषध घेऊन आराम मिळत नसेल तर काही आयुर्वेदिक घरगुती उपचार करून बघू शकता. यामुळे कोरडा खोकला बरा व्हायला मदत होईल. पाहूया कोरड्या खोकल्यावरील घरगुती औषधी उपाय.
आलं आणि मीठ
कोरड्या खोकल्याने त्रस्त झाला असाल तर आल्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यावर चिमूटभर घाला. दातांनी हे तुकडे चावा. यामुळे आल्याचा रस घशात येईल. आल्याचे तुकडे दातांखाली 5 ते 8 मिनिटे धरून ठेवा.
काळीमिरी आणि मध
मधात काळीमिरी पावडर मिसळावी. हे मिश्रण चाटावे. यामुळे कोरडा खोकला बरा व्हायला मदत होते. यासाठी 4-5 काळीमिरी वाटून त्याची पावडर करावी. त्यामध्ये मध मिसळावा.
आलं आणि मध
आलं आणि मध हे दोन्ही पदार्थ कोरड्या खोकल्यावर गुणकारी आहेत. मध आणि आल्याच्या रसात ज्येष्ठमध पावडर मिसळून सेवन केल्याने कोरडा खोकला बरा होतो. हे तीनही पदार्थ रोगप्रतिकारक्षमता वाढवणारे आहेत. एक चमचा मधात आल्याचा रस घालून प्यावा. तसेच घसा सतत कोरडा पडत असल्यास ज्येष्ठमधाची छोटीशी काडी तोंडात ठेवून चावावी. यामुळे घसा खवखवणे, कोरडा खोकला, घसादुखी असे त्रासही कमी होतात.
गरम पाणी आणि मध
कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने घशाला आराम मिळतो. खोकला झाल्यास रोज मध खावा किंवा रात्री झोपण्यापूर्वी मध मिश्रित कोमट पाणी प्यावे यामुळे कोरडा खोकला बरा होतो.






























































