
घोडय़ावरची मिरवणूक किंवा रपेट आपल्याला माहीत आहे, पण चक्क घोडय़ावरून फूड डिलिव्हरी! काय चकीत झालात ना… या अजब प्रकारचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. भरपावसात गाडय़ांच्या रहदारीत पांढऱया रंगाच्या घोडय़ावर बसून रस्ता ओलांडताना डिलिव्हरी बॉय व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजलेले नाही, पण मुंबईसारख्या एखाद्या शहरातील असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही आयडिया एकदम मस्त असल्याची प्रतिक्रिया नेटिजन्स देत आहे.


























































