स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी हे करून पहा, मिळेल डागरहीत त्वचा

आपल्यापैकी अनेक लोकांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स दिसतात. वजन वाढणे, कमी होणे, गरोदरपणा अशा अनेक कारणांमुळे स्ट्रेच मार्क्सची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत काहीजण महागडी स्किन केअर प्रोडक्ट्स वापरूनही ते स्ट्रेच मार्क्स कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यात यश मिळत नाही. जर तुमच्या बाबतीतही असे होत असेल, स्ट्रेच मार्क्स सहजासहजी जात नसतील तर काही नैसर्गिक उपाय करून तुम्ही त्यापासून लवकर सुटका मिळवू शकता. स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स जाणून घेऊया.

साखरेचा स्क्रब
त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स काढण्यासाठी तुम्ही साखरेचा स्क्रब तयार करू शकता. यामुळे त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स हळूहळू कमी होतात.

हळदीचा उपयोग करा
अँटी-ऑक्सिडंट तत्वांनी युक्त असलेली हळद स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यासाठी खोबरेल तेलात 1 चिमूट हळद टाकून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. यामुळे स्ट्रेच मार्क्स हळूहळू दूर होतील.

खोबरेल तेल लावावे
खोबरेल तेलाचा वापर स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी देखील उत्तम आहे. यासाठी खोबरेल तेलात कोरफडीचे जेल मिसळून त्वचेवर लावा. यामुळे त्वचेचे डागही कमी होऊ लागतील आणि तुमची त्वचा डागरहीत दिसेल.

बदामाचे तेल ठरेल उपयुक्त
बदामाच्या तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन ई हे देखील स्ट्रेच मार्क्स घालवण्यास अत्यंत प्रभावी आहे. यासाठी बदामाचे तेल स्ट्रेच मार्क्सची रोज लावून नियमित मसाज करा. यामुळे स्ट्रेच मार्क्स कमी होतील आणि तुमची त्वचा चमकदार होईल.

बेकिंग सोडा वापरून पहा
तुमची स्किन स्ट्रेच मार्क्स फ्री करायची असेल तर तुम्ही बेकिंग सोड्याचीही मदत घेऊ शकता. यासाठी बेकिंग सोड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट स्ट्रेच मार्क्सवर लावा. यामुळे त्वचेवरील डाग कमी होतील.

टी ट्री ऑईल वापरावे
टी ट्री ऑईलच्या मदतीने तुम्ही स्ट्रेच मार्क्सला कायमचे अलविदा म्हणू शकता. यासाठी टी ट्री ऑईलमध्ये ऑलिव्ह ऑईल मिक्स करून स्ट्रेच मार्क्सवर लावा. हे नियमितपणे केल्यास स्ट्रेच मार्क्स कमी होऊ लागतील.

कोरफडीचे जेल ठरेल सर्वात उपयुक्त
त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी तुम्ही कोरफड जेलची मदत घेऊ शकता. यासाठी बदामाच्या तेलात किंवा खोबरेल तेलात कोरफडीचे जेल मिसळा. आता हे मिश्रण स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि मसाज करा. थोड्या वेळाने ती जागा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार दिसेल.

बटाट्याचा रस
स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी बटाट्याचा रस लावणे हा देखील उत्तम पर्याय आहे. यासाठी बटाट्याच्या रसात हळद मिसळून ते मिश्रण स्ट्रेच मार्क्सवर लावा. यामुळे त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स काही दिवसातच निघून जातील.