असं झालं तर… एसआयपी बंद करायची आहे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  1. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (AMCs) SIP बंद करण्यासाठी कोणताही दंड आकारत नाहीत. SIP रद्द करण्यासाठी लागणारा वेळ प्रत्येक फंड हाऊसनुसार बदलू शकतो.

  2. एसआयपी रद्द करण्याचे फॉर्म मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (AMCs) किंवा हस्तांतरण आणि निबंधक एजंट (R&T) यांच्याकडे उपलब्ध असतात.

  3. गुंतवणूकदारांनी पॅन, फॉलिओ क्र., बँक खात्याचे तपशील, योजनेचे नाव, एसआयपी रक्कम आणि ज्या तारखेपासून योजना बंद करायची आहे ती लिहिणे आवश्यक आहे.

  4. फॉर्म भरल्यानंतर तो AMC शाखा किंवा R&T कार्यालयात जमा करावा लागेल. एसआयपी बंद होण्यासाठी सुमारे २१ कामकाजाचे दिवस लागतात.

  5. तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड खात्यात लॉग इन करून ‘एसआयपी रद्द करा’ हा पर्याय निवडू शकता. तसेच तुम्ही विशिष्ट AMC वेब पोर्टलवर लॉग इन करून ती रद्द करू शकता.