अलर्जी का होते?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलर्जी असणे ही एक सामान्य बाब आहे. ती कोणालाही होऊ शकते. त्वचेची अलर्जी, धुळीची, अन्नाची अशा अनेक प्रकारच्या एलर्जी असतात. यामुळे अंगावर खाज येणे, पुरळ येणे, सर्दी खोकला , अचानक शिंका येणे, सूज येणे अशा समस्या निर्माण होतात.अलर्जी होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे कमकुवत प्रतिकारशक्ती .
अलर्जी काय आहे?- जेव्हा आपले शरीर एखादी गोष्ट सहन करू शकत नाही, त्याच्या संपर्कात आल्यावर त्रास होतो त्याला अलर्जी म्हणतात. विशिष्ठ सुगंध, अन्न, धूळ, माती आणि धुरामुळे एलर्जी होऊ शकते. यातून खाज सुटणे, शिंका येणे, धाप लागणे इ. प्रकार होतात.
अन्नापासून अलर्जी – शेंगदाणे, अंडी, तेल, दुध या गोष्टींची अलर्जी असेल तर त्या खाल्ल्यानंतर मळमळ, उलटी, शरीरावर खाज सुटणे, पुरळ उठणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
धुळीपासून अलर्जी – काही लोकांना धुळीच्या कणाच्या संपर्कात येताच शिंका येणे सुरु होते. खोकला येऊ लागतो. कारण धुलीकणामध्ये सूक्ष्म जंतु असतात. हे जंतु धुळीचे लोट उठल्यावर जास्त कार्यान्वित होतात. आणि मग शिका, खोकल्यासोबत नाका-डोळ्यातून पाणी येऊ लागते.
कीटक, डासांची अलर्जी – एखादा जरी विशिष्ठ कीटक किंवा डास चावला तर त्वचेचा दाह होतो, त्वचा लाल होते, सूज येते, ताप येतो.
अलर्जीपासून कसे वाचाल ?- ज्या गोष्टींची अलर्जी आहे त्यापासून दूर राहा. ज्यांना धूळ, मातीची अलर्जी आहे त्यांनी कायम तोंडाला मास्क लावावा. डॉक्टरांचा नियमित सल्ला घ्यावा. अलर्जीच्या गोष्टी टाळण्याबरोबरच त्यावर योग्य ते औषधोपचार घ्यावेत. पौष्ठिक आणि सात्विक अन्न खावे. फळे, भाज्या खाण्यावर भर द्यावा.