दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरताय…

वारंवार एटीएममधून पैसे काढण्याऐवजी खरेदीच्या ठिकाणी कार्ड स्वाइप करून पेमेंट करावे. त्यामुळे एटीएम कार्डाच्या वापराची गरज कमी करता येऊ शकते. तसेच एटीएम वापराचे अतिरिक्त शुल्क देण्याची गरज पडणार नाही.

बँकेतून पैसे काढणे म्हणजे खातेधारकांसाठी वेळखाऊ प्रक्रिया असते. परंतु एटीएम आल्यापासून पैसे काढणे आणि अतिशय सहज आणि जलद झाले आहे. त्यामुळे पॅशलेश व्यवहारांना चालना मिळत आहे. मात्र अनेकदा असे होते की आपल्या बँकेची शाखा जवळपास नसते आणि आपल्याला अचानक पैशांची गरज भासते. अशावेळी आपण दुसऱया  बँकेच्या एटीएम सेंटरवर जाऊन पैसे काढतो. त्याला थर्ड पार्टी एटीएम असे म्हटले जाते. दुसऱया बँकेच्या एटीएममार्फत केवळ पाचच व्यवहार मोफत करता येतात.

आपला ग्राहक नसलेल्या व्यक्तींना रोख देण्यासाठी  बँका काही सेवाशुल्क आकारतात. त्याचे दर रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार ठरवले जातात. खासगी बँका त्यांचे वेगळे दर ठरवत असतात. म्हणजेच एटीएम कार्डाचा पाचपेक्षा जास्त वेळा वापर केला तर आपल्याला सेवाशुल्क लागू शकते. मात्र कार्ड वापरून रोख रक्कम काढण्यापेक्षा  कार्ड स्वाइपचा मार्ग निवडता येतो. कारण कार्ड किती वेळा स्वाइप करावे, यावर अजून तरी मर्यादा नाही.