गणिताची भीती कशी हाताळावी, आगामी परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी विषयाचे धोरण

>> हृषिकेश जाधव, प्रमुख, BYJU’S ट्यूशन सेंटर, श्रीनगर, नांदेड (महाराष्ट्र) अकॅडेमिक सेंटर

गणिताचे फॉर्म्युले समोर येताच डोक्यामध्ये धोक्याची घंटा घणघणू लागते का? असे होत असेल तर गणिताच्या बाबतीत तुम्ही भिती बाळगून आहात असा त्याचा अर्थ असू शकतो हे तुम्ही समजून घ्यायला हवे आणि गणिताबद्दलचा तुमचा आणि केवळ तुमचाच दृष्टिकोन एकतर गणितात तुमची मदत करू शकतो किंवा तुम्हाला ‘कसे’ ‘का’ ‘कधी’ ‘कुणी’ आणि अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या मार्गावरून दूर नेऊ शकतो. हा विषय काही केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नाही, मग तो पायथागोरसचा सिद्धांत असो किंवा आर्यभट्टाची शून्याची संकल्पना असो किंवा युक्लिडची गृहितके असोत किंवा श्रीधराचार्यांच्या चतुर्भुज समीकरणांचे मूळ शोधण्याचा फॉर्म्युला असो, सारे काही अंकाच्या खऱ्याखुऱ्या जगामध्ये आजमावून पाहता येथे जिथे केवळ तर्क चालतो. तेव्हा गणित कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर समजून घेत गणिताबद्दलची ही भीती मनातून दूर करूया.

औत्स्युक्य शमू देऊ नका: केवळ प्रश्नाची उकल शोधण्यापर्यंत मर्यादित राहू नका, कारण गणितामध्ये एखादे समस्या विधान बदलून मांडण्याचे अनेक मार्ग असतात. तुमच्या समोर असलेल्या प्रश्नाचा गाभा शोधा आणि केवळ उत्तर शोधण्यापुरता विचार करणे टाळा, तथ्यांचा शोध घ्या आणि आपल्या उत्तराला तार्किकतेचा आधार द्या, मग तुम्हाला दिसेल की, तुमच्या गणिताच्या अध्ययनाने आता योग्य दिशा पकडली आहे. जर यात अपयश आले तर आपण अजूनही शिकत आहोत आणि प्रश्न सोडविण्यासाठी आपण निवडलेला मार्ग योग्य नव्हता असे समजा. पुढील यशासाठी तुम्ही गिरवलेला तो एक धडा असेल.

गणिताच्या ड्रॉइंग बोर्डपाशी नव्याने उभे रहा. एखादे गणित तुम्हाला एकदा सोडवता आले, तर त्याचा अर्थ ते दुसर्या वेळी सोडवता येईलच असे नाही. एखाद्या फॉर्म्युला किंवा सिद्धांतावर, गणितावर हुकूमत मिळविण्यासाठी सराव लागतो आणि निश्चित कालांतराने उजळणी करावी लागते. आणि ही बाब एका प्रमुख नियमात सहजपणे विशद करण्यात आली आहे:

सराव – तुम्ही जितका वेळ सराव कराल आणि त्याला नियमित उजळणीची जोड द्याल तितके गणिताचे अधिक चांगले आकलन होईल. उत्तर भलेही बरोबर येत नसेल पण तुमच्या प्रयत्नांमधील सातत्याने फळ शेवटी तुम्हाला मिळेलच.

विचार करा: कंटाळा टाळायचा असेल तर सतत ‘का?’ या प्रश्नाचा विचार करत रहा. तरीही कंटाळा येत असेल तर व्हिज्युअलायझेशन आणि कल्पनाशक्तीची मदत घ्या; आणि हे करण्यासाठी तुम्हाला माहितीचा तुमच्या अभ्यासाशी सुसंगत आणि अस्सल स्त्रोत लागेल. BYJU’s लर्निंग मंच तुम्ही शिकत असलेल्या गोष्टींचे एक सुस्पष्ट चित्र खेळकरपणे व कोणत्याही कंटाळ्याविना तुमच्या डोळ्यांसमोर तयार करण्यासाठी खुला आहे.

चांगले गुण मिळविण्यासाठी कोणते धडे मदत करतील ते ओळखा: गणिताच्या अभ्यासक्रमामध्ये १५ धडे आहेत, पण त्यातील सगळ्या धड्यांना सारखेच महत्त्व नाही. गुणांच्या संदर्भात बोलायचे झाले तर नंबर सिस्टीम, बीजगणित, भूमिती आणि ट्रिग्नोमॅट्री व मेन्सुरेशन या विषयांना अधिक वजन असते, ज्यामुळे आपल्या तयारीमध्ये या धड्यावर भर देणे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असते. असे केल्याने विद्यार्थ्यांची परीक्षेत यशस्वी होण्याची शक्यता जास्तीत-जास्त असेल.

मॅथ कोड सोडवा: फॉर्म्युले आणि सिद्धांताची परिणामकारक उजळणी करण्यासाठी तुम्ही त्यांची लेखी नोंद ठेवणे योग्य ठरेल. त्याचबरोबर परीक्षेची तयारी करताना तुम्हाला आढळून आलेले काही महत्त्वाचे मुद्दे किंवा सूचना लिहून ठेवा, जे फायद्याचे ठरू शकते. केवळ पाठ करण्यापेक्षा प्रत्येक फॉर्म्युला आणि सिद्धांतामागे असलेली मुलभूत तत्वे समजून घेण्यावर मेहनत करा. यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचा परिणामकारक वापर करता येईल.

उदाहरणार्थ पायथागोरसचा सिद्धांत: एका काटकोन त्रिकोणामध्ये, त्याच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा त्याच्या इतर दोन बाजूंच्या लांबींच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. (c^2 = a^2 + b^2). “काटकोन त्रिकोणाच्या सर्व बाजू परस्परांशी संबंधित असतात” या भाषेत तुम्ही तो सहज लक्षात ठेवू शकता.

PYQ च्या माध्यमातून हमखास रिझल्ट्स मिळवा: परीक्षेसाठी सगळी तयारी करताना आदल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडविल्याने परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न येण्याची शक्यता आहे, याविषयीची तसेच पेपरच्या एकूण रचनेवियी मौल्यवान माहिती तुम्हाला मिळू शकेल. यामुळे आपल्याला कुठे सुधारणा करायची आहे हे ओळखणेही शक्य होईल आणि परीक्षेच्या दिवसासाठी विद्यार्थ्यांची पुरेशी तयारी खात्रीने होईल.

एकाच ठिकाणी पोहोचण्याचे अनेक मार्ग असतात हे लक्षात ठेवा आणि तुम्ही ज्या विषयाशी झगडत आहात तो गोष्टी गुंतागुंतीच्या करण्यासाठी नव्हे तर गुंतागुंतीच्या गाठी सैल करण्यासाठी, गोष्टींतील गुंतागूंत कमी करण्यासाठी, जटिल गोष्टींच्या सुलभीकरणासाठीची साधने पुरविण्यासाठी आणि त्यांना सोप्या करण्यासाठी तयार करण्यात आला होता. आत्मविश्वास आणि सरावाने तुम्ही नक्कीच हवे तेवढे मार्क मिळवू शकाल.
तुमच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट !!