गेली चार दिवस धगधगतेय आसामची ही नदी, धुराने काळवंडले आकाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसामच्या डिब्रुगडमधील एका नदीत भीषण आग लागली आहे. या नदीतून ऑएल इंडिया लिमिटेडची पाईप लाईन जाते. ही पाईप लाईन फुटल्यामुळे नदीत भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण आहे की संपूर्ण आकाश धुराने काळवंडले आहे.

गेले तीन दिवस ही आग लागलेली आहे. स्थानिक प्रशासनाने माहिती मिळाल्यानंतरही कुठलीच कारवाई केलेली नाही. ही नदी नाहरकटिया भागातील ससोनी गावातून वाहते. आगीमुळे संपूर्ण भाग काळवंडला आहे. नदीत इंन पडल्यानंतर काही समाजकंटकांनी ही आग लावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या आगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गेले तीन दिवस ही नदी धगधगत असून प्रशासन कुठलीच कारवाई करत नाहिये.