Crime News- पत्नीचा मृतदेह बेडमध्ये लपवून पती झाला फरार

हिंदी चित्रपटातील दृश्याप्रमाणे वृद्ध पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह बेडरूममध्ये लपवून पती फरार झाल्याची घटना गोरेगाव येथे घडली. रागिणी सावर्डेकर असे मृत महिलेचे नाव आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या पतीचा गोरेगाव पोलीस शोध घेत आहेत.

रागिणी या ज्येष्ठ नागरिक असून त्या अविवाहित होत्या. त्या गोरेगावच्या मोतीलाल नगर येथे राहत होत्या. आईच्या मृत्यूनंतर तिने पैसे बचत करून काही घर घेतली होती. ती घरभाडय़ावर ती उपजीविका करत होती. त्याच काळात तिची प्रताप बास्कोटीसोबत ओळख झाली. त्याने तो चित्रपटसृष्टीत असल्याचा दावा केला होता. प्रताप हा रागिणीच्या एका भाडेकरूचा मित्र असल्याने तो वारंवार घरी येत असायचा. ओळखीचे रूपांतर नात्यात झाले. तेव्हापासून ते दोघे एकाच घरात राहत होते.

रविवारी प्रतापने शेजारील रहिवाशाला बाहेर जात असल्याचे सांगून तो निघून गेला. ते दोघे परत न आल्याने शेजारील रहिवाशांनी रागिणीच्या मोबाईलवर पह्न केला तेव्हा तिचा पह्न बंद येत होता. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने शेजारील रहिवाशाने रागिणीच्या नातेवाईकांना पह्न केला. नातेवाईकांनी रागिणी तेथे आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर रागिणीच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारील रहिवाशांनी याची माहिती गोरेगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी लोखंडी बेड उघडला तेव्हा कापडात रागिणीचा मृतदेह दिसला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.