पत्नी माहेरून परतली नाही म्हणून कापले स्वतःचे गुप्तांग, गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न

प्रातिनिधिक फोटो

बायको माहेरून परत आली नाही म्हणून एका तरुणाने स्वतःचे गुप्तांग कापून घेतले आहे. इतकेच नाही तर गळा चिरून आत्महत्येचाही प्रयत्न केला आहे. कानपूरमधील ही घटना असून जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कानपूरमध्ये महेश (नाव बदलले) या 26 वर्षीय तरुणाचे पाच वर्षापूर्वी लग्न झाले होते. महेशला एक चार वर्षाचा मुलगाही आहे.  दीड महिन्यापूर्वी महेशच्या बायकोला डेंग्यूची लागण झाली होती. उपचारासाठी ती माहेरी गेली होती. माहेरी गेल्यानंतर ती सासरी येण्याचे नावच घेत नव्हती.

महेश जेव्हा तिला आणायला जायचा ती नकार द्यायची. तसेच गेल्या काही दिवसांपासून तिने महेशशी फोनवरून बोलणेही टाळले होते. त्यामुळे महेश खूप तणावात होता. बुधवारी रात्री या तणावा त्याने स्वतःचे गुप्तांग कापून घेतले आणि गळ्यावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

जेव्हा कुटुंबीयांनी महेशला जेवण्यासाठी बोलवायला गेले तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यत आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या