
विनोद पवार, पिंपरी
महिलेवरील खूनी हल्ला केल्याप्रकरणी प्रमुख आरोपी सुशील मंचरकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी मंचरकर याला गवळीमाथा येथून अटक करण्यात आली. सुशील मंचरकर हे राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती आहेत. सुशील मंचरकर यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. तुरूंगातील आरोपीला पळवून लावणे, कामगार नेते कैलास कदम यांच्या हत्येचा कट रचणे, असे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. या गुन्हयांमध्ये त्यांना मोक्का लावण्यात आला आहे.
ज्या महिलेवर हल्ला झाला आहे त्या महिलेने २०१४ मध्ये मंचरकर यांच्या विरोधात विनयभंगाची फिर्याद दिली होती. याचा राग मनात धरून शील मंचरकर यांनी महिलेवर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर फरार झालेल्या मंचरकर यांचा पोलीस शोध घेत होते. ते गवळीमाथा येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी सुरेन्द्र आव्हाड यांना मिळाली होती , या महितीच्या आधारे मंचरकर यांना अटक करण्यात आली.


























































