लग्नाच्या मांडवातून नवरा पळाला, नवरीने वरातीत आलेल्या तरुणाशी त्याच मांडवात केलं लग्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे लग्नाच्या वेळी एक अजबच घटना घडली. लग्नाच्या मांडवातून अचानक नवरा गायब झाला, पण पोलिसांकडे मात्र वर आणि वधू दोन्हीकडच्या पक्षांनी वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या.

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील महाराजपूर परिसरात विवाहाच्या वेळी वधू-वराने एकमेकांच्या गळ्यात हार घालण्याच्या विधीची तयार सुरू होती. अशावेळी नवरा आश्चर्यकारकरित्या लग्नमंडपातून नवरा गायब झाला. अचानक नवरा दिसेनासा झाल्यामुळे वधू आणि तिचे कुटुंबीय घाबरले. त्यांनी सर्वत्र नवऱ्याचा शोध घेतला.

नवऱ्याला शोधूनही त्याचा कुठेच शोध लागला नाही. पण त्यांच्या कुटुंबीयांकडून नवरीच्या नातेवाईकांना असे कळले की, तो जाणूनबुजून पळून गेला आहे आणि त्याचे असे अचानक गायब होण्याचे कारण त्यालाच माहीत असावे. यामुळे नवरी आणि तिचे कुटुंबीय त्रस्त झाले. इतक्यात लग्नसोहळ्याला आलेल्या पाहुण्यांपैकीच काहींनी लग्नाला आलेल्या तरुणांपैकी एका तरुणाची निवड करून त्याच्याशी लग्न करण्याचा सल्ला दिला. वधूच्या कुटुंबीयांना पाहुण्यांनी दिलेला हा सल्ला पटला. त्यांनी वरातींपैकीच एका तरुणाची निवड करून त्याच लग्नमंडपात आपल्या मुलीचे लग्न लावून दिले.

त्यानंतर नवरीच्या नातेवाईकांनी वराची आणि त्याच्या कुटुंबीयांची पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. याबाबत नरवाल ठाणा परिसरात पोलीस निरीक्षक नारायण पांडे यांनी सांगितले की, आमच्याकडे वर आणि वधू दोन्ही पक्षांकडून तक्रार नोंदवण्यात आली आहे. नवरीच्या कुटुंबीयांनी वर आणि त्याच्या कुटुंबीयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पळून गेलेल्या नवऱ्याचे वडील धर्मपाल यांनी आपल्या हरवलेल्या मुलाचा शोध लावण्याकरिता पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. या प्रकरणाचा पोलीस शोध घेत आहेत.